सिल्लोड, (प्रतिनिधी) येथील वृक्षवल्ली टीम ने कर्जत तालुक्यातील होणारी जंगल तोड आणि टोरेंट कंपनीचा प्रोजेक्ट याचा तीव्र विरोध करत तहसीलदारांना निवेदन दिले निवेदनात आणि चर्चेदरम्यान सदस्यांनी त्यांनी तहसीलदार सागर वाघमारे यांच्याशी बोलतांना एखादे छोटेसे झाड मोठे होऊन पूर्णपणे विकसित होण्यासाठी किमान ८ ते १० वर्षांचा कालावधी लागतो; मात्र ते झाड तोडण्यासाठी काही क्षणांचाही वेळ लागत नाही.
भीमाशंकर परिसरातील ही वनराई, महावृक्ष आणि समृद्ध जैवसृष्टी उभी राहण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागला आहे. भीमाशंकर परिसरातील जंगल हे लाखो करोडो जीवांचे नैसर्गिक अधिवास आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास येथील जैवविविधता गंभीरपणे धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा संवेदनशील
वनक्षेत्रात कोणताही विकासात्मक प्रकल्प राबविताना पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे असे मत वृक्षवल्ली टीम सिल्लोड च्या सदस्यांनी व्यक्त केले.
डॉ. संतोष शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना एका बाजूला शासन आणि वन विभागाच्या माध्यमातून ङ्गङ्घझाडे लावा, झाडे जगवाफ्फ तसेच वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती केली जात असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या जंगलतोडीचा विचार होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, त्याचबरोबर डॉ विकास गोठवाल यांनीया प्रस्तावित प्रकल्पासाठी भीमाशंकर परिसरातील जंगलतोड करण्याच्या निर्णयाचा आम्ही, वृक्षवल्ली टीम, सिल्लोड, तीव्र निषेध करीत आहोत.
सदर निर्णयाचा पुनर्विचार करून पर्यावरणीयदृष्ट्या सुरक्षित असलेल्या अन्य योग्य जागेची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी आमची शासनाकडे नम्र परंतु ठाम मागणी आहे असे निवेदन सिल्लोड येथील तहसीलदार सागर वाघमारे यांना दिले. या प्रसंगी वृक्षवल्ली टीम चे अध्यक्ष डॉ शेखर दौड, डॉ निलेश मिरकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विकास गोठवाल. डॉ. अक्षय खंडेलवाल, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. निलेश तायडे, डॉ विक्रांत लुटे, डॉ शेखर रोकडे, डॉ. विशाल आकते,
आशिष गोराडे, चेतन रोकडे, राईस बागवान, ई वृक्षवल्ली टीमचे सदस्य उपस्थित होते.
आमचा विकासाला, किंवा प्रकल्पामुळे मिळणाऱ्या रोजगाराला विरोध नाहीये परंतु जी जागा निवडली आहे तिथे लाखो जीवसृष्टी कित्येक वर्षापासून नांदत आहे त्यामुळे जैविविधता टिकून आहे, वृक्षतोडीमुळे ती संपूर्ण जैविविधता कायमची संपुष्टात येईल, आपल्या म्हणण्यानुसार झाडे पुन्हा लावता येईल पण जीव सृष्टीच्या हत्या मात्र होणार आहे हे दुर्दैव पाप टाळता आले तर बरे होईल.
- डॉ शेखर दौड (वृक्षवल्ली टीम सिल्लोड)















